जळगावात भाजपला मोठा धक्का; तब्बल 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

0
481

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेकडून भाजपाला धक्क्यांवर धक्के देणे सुरुच आहे. आज पुन्हा शिवसेनेने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील 11 भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

आज ज्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला ते भाजपमधून आलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत, त्यामुळे हे नगरसेवक राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता होती. मात्र या नगरसेवकांनी राष्ट्र्वादीऐवजी शिवसेनेला पसंती दिली. यामुळे हा भाजपसोबत एकनाथ खडसेंना मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी सेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील सुद्धा यावेळी उपस्थितीत होते.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार राज्यातल्या शाळा

सोमय्यांची अडवणूक करू नका, त्यांना कोल्हापूरला येऊ द्या; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन

कारमध्ये रोमान्स पडला भारी! विचित्र परिस्थितीत अडकलं कपल, गाडीतून बाहेर पडणं झालं मुश्किल; कारण…

करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here