Home महत्वाच्या बातम्या ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार राज्यातल्या शाळा

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार राज्यातल्या शाळा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मंजुरीनुसार आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करून शाळा सुरू होतील. मात्र, कुठले वर्ग सुरू करण्यात येणार याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, शाळा सुरू करण्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असली तरी जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरू केल्या जातील. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरू  किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

कारमध्ये रोमान्स पडला भारी! विचित्र परिस्थितीत अडकलं कपल, गाडीतून बाहेर पडणं झालं मुश्किल; कारण…

करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

“आपल्या माता-भगिनींवर वेळ ओढावल्यावर कुठला कुटुंबप्रमुख अन्य राज्यातील परिस्थिती दाखवेल?”