उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पालघर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

0
378

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पालघरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पालघरचे जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : …तर देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत; पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेवर राज ठाकरेंचा गृहमंत्र्यांना इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.

दरम्यन, पालघरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव संख्ये, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील आणि शिवसैनिकांना राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

गृहमंत्रीपदासाठी अजित दादा योग्य, राष्ट्रवादीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो: मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार?; खुद्द एकनाथ खडसेंनी केला खुलासा, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here