आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक अमेय घोले यांनी युवासेनेतील पदाचा राजीनामा दिला आहे. काही वेळातच ते मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
ही बातमी पण वाचा : तुम्हाला सत्ता पाहिजे ना आम्ही देतो, मात्र…; उध्दव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
अमेय घोले यांनी आपल्या राजीनाम्याबाबत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे, ठाकरे गटाच्या महिला संघटक ‘श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी वारंवार माझ्या कामात अडथळे आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे मला काम करताना खूप त्रास व मनस्ताप झाला. याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती’, असं अमेय घोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, आदित्य जी आपली मैत्री ही केवळ राजकारणापुरती नाही. तुमच्या बरोबरचा संघटनेतील माझा प्रवास थांबवत असलो तरी आपली मैत्री कायम राहावी हीच अपेक्षा व्यक्त करतो, असंही अमेय घोले यांनी पत्रात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी
“गुजरातवर राजस्थान भारी, संजू सैमसन-हेटमायरने सामना गुजरातच्या हातातून हिसकावून घेतला”
जयंत पाटलांचं, उद्धव ठाकरेंच्या समोरच अजित पवारांबद्दल मोठं विधान, म्हणाले…
नाशिकमध्ये राजकीय भूकंप होणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह 11 माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये