शरद पवारांना मोठा धक्का; हा बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

0
245

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रायगड : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला रायगडमध्ये मोठा धक्का बसणार असल्याची माहिती मिळत आहे.

शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी पक्षाचे रायगड जिल्ह्यातील माजी आमदार आता थेट भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘हा’ फायदा

शरद पवार गटाचे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड भाजपात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, त्यांचा हा निर्णय शरद पवार गटासाठी धोकादायक ठरु शकतो. कारण त्यांच्यासह कर्जतचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष हे सुद्धा भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत…; नाना पटोलेंचं भाजपला आव्हान

ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप नंबर वन; कुणाच्या पारड्यात किती जागा? वाचा सविस्तर

मराठा समाजाला आरक्षण देताना…; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here