मोठी बातमी! मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड; कोयत्याने वार करून फोडली गाडी

0
2421

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी चिंचवड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असताना पिंपरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना समोर आली तिघा जणांनी पांचाळ यांची गाडी फोडल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

गुरुवार पहाटेच्या सुमारास मनसेच्या महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांच्या वाहनांची अज्ञात तिघांनी तोडफोड केली. या प्रकरणी वाकड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. याच रागातून आपल्या कारची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप अनिता पांचाळ यांनी केला.

हे ही वाचा : “…पण खरी बातमी तर अशी आहे की, उदय सामंत मनसेत प्रवेश करण्याची शक्यता; मनसेचा पलटवार

पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी भागात अनिता पांचाळ राहतात. त्या आगामी महापालिका निवडणूक लढवण्यास अनुकूल असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा वावर त्या परिसरात वाढला आहे.

दरम्यान, रस्त्याच्या कडेला त्यांनी पार्क केलेली मोटार आज पहाटेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याने वार करून फोडली. यात, त्यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान”

मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; घाटकोपर येथील असंख्य तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा

“महाविकास आघाडी घाबरली, नवी मुंबईत महापाैर भाजपचाच होणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here