“मोठी बातमी! नंदनवन बंगल्यावर शिंदे-फडणवीसांमध्ये तासभर खलबतं, शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न”

0
400

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी पसरली असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे सर्व महत्त्वाची खाती हे राष्ट्रवादीच्या वाटेला जातील, अशी शिवसेना आमदारांची तक्रार असल्याची चर्चा आहे. यानंतर शिवसेनेच्या नेत्यांमधील धकधक सूरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून काल बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर आता भाजपकडून शिंदे गटाची नाराजी दूर करण्याच्या हालचाली सूरू असल्याचं समोर येत आहे.

ही बातमी पण वाचा : सोलापुरात भाजपला मोठा धक्का; चार माजी नगरसेवक भाजपमधून बाहेर

आज नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली आहे. जवळपास तासभर ही बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

ठाकरे गटाशी युती करण्याच्या चर्चेवर मनसे आमदाराचं मोठं विधान, म्हणाले, तुमच्यावर वेळ आली म्हणून…

शरद पवार देणार अजित पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

“या चिमण्यांनो, परत फिरा रे…; ठाकरे गटाच्या आमदाराची, शिंदे गटाला माघारी फिरण्याची साद?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here