आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आयपीएल 2024 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सज्ज झाली आहे. 2023 च्या हंगामात आरसीबीचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं होतं.
14 पैकी फक्त 7 सामने जिंकलेल्या आरसीबी संघाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यावेळी आरसीबीने घरच्या मैदानावर म्हणजेच चिन्नास्वामीवर 7 सामने खेळले. यात केवळ 3 सामने आरसीबीने जिंकले होते. 2019 नंतर आरसीबी संघ लीग स्टेजमधून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे फाफ च्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
ही बातमी पण वाचा : तुम्ही आणि उद्धव पुन्हा एकत्र येणार का?; राज ठाकरेंचं भावूक उत्तर, म्हणाले…
फाफच्या नेतृत्वाखाली आरसीबीने एकूण 27 सामने खेळले आहेत. त्यात फक्त 14 सामन्यांत आरसीबीने विजय मिळवला तर 13 सामने गमावले. डुप्लेसिसच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने तीन सामन्यांमध्ये आरसीबी संघाचे नेतृत्व केले. यावेळी कोहलीच्या नेतृत्वात 2 सामन्यात संघाला विजय मिळाला. तसेच यावेळी कोहलीने आपल्या आधीच्या आक्रमक नेतृत्वाने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यामुळे आरसीबी पुन्हा एकदा कोहलीला कर्णधारपद देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, विराट कोहलीने टीम इंडियाच्या तीन संघांचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे त्याच्यावर आता कोणतीच जबाबदारी नाही. कोहली आता पूर्णपणे मोकळा असून ही जबाबदारी तो पु्न्हा एकदा खांद्यावर घेऊ शकतो. त्यामुळे आयपीएलच्या पुढच्या हंगामात आरसीबी पुन्हा एकदा विराट कोहलीला कर्णधारपद दिले तर आश्चर्य वाटणार नाही.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! सांगलीत रिलायन्स ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा
नाना पटोलेंच्या पोस्टर्सची राज्यभर चर्चा; भावी मुख्यमंत्री म्हणत उल्लेख