मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार?; खुद्द एकनाथ खडसेंनी केला खुलासा, म्हणाले…

0
682

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली असल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर अखेर स्वत: एकनाथ खडसे यांनी भाष्य करत स्पष्टीकरण दिलं आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

‘एकाच घरात दोन लोकं दोन वेगवेगळ्या पक्षात असणं काही नवं नाही. आमच्याही घरात तसं आहे’, असं खडसे म्हणाले. तसेच अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहे. त्यासाठी त्यांच्याशी फोनवरुन बातचीत केली होती,’ असं म्हणत खडसेंनी भाजपमध्ये जाण्याच्या बातमीचं खंडन केलं आहे. तसेच शहांसोबत झालेल्या फोनवरील चर्चेचे राजकीय अर्थ काढू नये, असंही खडसे म्हणाले.

दरम्यान, खासदार रक्षा खडसे  यांनी माध्यमांशी बोलताना, मुळात एकनाथ खडसे आणि अमित शहा यांच्यात भेट होणार होती. पण अमित शहा यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही भेट शक्य होऊ शकली नाही. म्हणून फोनवरुन त्यांनी अमित शाह यांच्याशी संवाद साधला होता, असं रक्षा खडसे म्हणाल्या होत्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाला परवानगी; उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

‘या’ कारणासाठी ज्योतिषी नेमणे आहे; मनसेने शिंदे सरकारला डिवचलं

बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना, त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून केली नव्हती तर…; शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्यानं उद्धव ठाकरेंना फटकारलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here