Home महाराष्ट्र बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना, त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून केली नव्हती तर…; शिंदे...

बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना, त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून केली नव्हती तर…; शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्यानं उद्धव ठाकरेंना फटकारलं

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. या फूटीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.  यानंतर शिवसेनेत 2 गट पडले आहेत. एक उद्धव ठाकरेंचा तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. त्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. यावरून आता शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केलेले राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना, मुलगा मुख्यमंत्री व्हावा म्हणून केली नव्हती, तर सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर बसावा ही त्यांची इच्छा होती, असं म्हणत दादा भुसेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. अलिबाग येथे शिवसेना जिल्हा कार्यकारणीची बैठकी पार पडली. यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : नारायण राणे थर्ड क्लास व्यक्ती आहे; शिवसेनेची टीका

दरम्यान, आम्ही शिवसेनेसोबत बंडखोरी केली नाही तर आम्ही उठाव केला, असंही दादा भुसे म्हणाले. तसेच घरातला विषय घरात मिटावा अशी आमची इच्छा होती. उद्धव ठाकरेही आमच्याशी चर्चा करण्यासाठी तयार होते. मात्र कोणीतरी येऊन खडा टाकायचे. त्यामुळे विषय टोकाला गेला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीच शिवसैनिकांना बोलले नाही. ते आज जे करत आहात ते आधी केले असते तर ही परिस्थिती उद्धवलीच नसती, असंही दादा भुसेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती, उद्या…; मनसेचं उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र

…तर ठाकरे सरकार कधीच पडलं नसतं; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

 आदित्य ठाकरे तर तुरूंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही अन् तुम्ही…; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा