Home महाराष्ट्र “मोठी बातमी! शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्यांवर संकट?; थेट मंत्रीमंडळातून मिळणार डच्चू”

“मोठी बातमी! शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्यांवर संकट?; थेट मंत्रीमंडळातून मिळणार डच्चू”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध राजकीय मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सूरू असल्याचं चित्र सध्या राज्यात सूरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे मंत्रीमंडळ विस्तार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असलेल्या मंत्रीमंडळाने कारभार पाहिल्यानंतर आत्तापर्यंत फक्त एकच मंत्रीमंडळ विस्तार अजून झालेला नाही. मात्र, आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या काही नेत्यांना डच्चू देखील मिळणार असल्याची चर्चा आहे. तर काही नेत्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…; पंकजा मुंडे यांचा एल्गार

समोर आलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या विस्तारात कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संजय राठोड, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी शिवसेनेच्या काही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे केंद्रात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, गजानन कीर्तीकर, श्रीरंग बारणे, भावना गवळी या नेत्यांची नावे मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चेत येत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“वरात दारात येऊन थांबली, अन् नवरी मुलीने दिला लग्नाला नकार; कारण वाचून थक्क व्हाल”

“शरद पवारांच्या गुगलीला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, पवार साहेबांनी मान्य केलं की,…”

…तर आम्ही थेट पंतप्रधान मोदींना जाहीर पाठिंबा देऊ; शरद पवारांचं मोठं विधान