आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
डोंबिवली : डोंबिवली मानपाडा येथे डोंबिवली पूर्व भाजप मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर भाजप कार्यकर्ते अन् पदाधिकारी आक्रमक झालेत.
भाजप कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. यानंतर कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
ही बातमी पण वाचा : “तुम्हाला सरकार चालवता येत नसेल तर पायउतार व्हा”
दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
डोंबिवली पूर्व भाजप मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यांविरोधात एका महिलेकडे घर खाली करण्याची धमकी देत शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
कधी कधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंची टीका
…तर दंगली रोखण्यासाठी मागे पुढे काही पाहणार नाही; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराचा इशारा
“मी भाजपाची बदनामी करतो असे एखादं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावं”