आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
भुवनेश्वर : ओडिशा राज्यांत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रदीप मांझी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. यासंदर्भात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांनी माहिती दिली.
प्रदीप मांझी हे नबरंगपूर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. शेवटी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पक्षात उत्साहाची कमी असल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
हे ही वाचा : नवरदेवीच्या अदांवर वऱ्हाडी फिदा, बाल्कनीत येताच केलं असं काही की, सगळे पाहतच राहिले; पहा व्हिडिओ
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार कैलाश कुलेसिका यांनी काँग्रेसला रामराम ठोकत सत्ताधारी बिजू जनता दलामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मांझी यांनीही पक्षाला रामराम ठोकल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबईतील लालबाग परिसरात ‘वन अविघ्न’ या इमारतीला भीषण आग; एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू
बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी मोदी सरकारने तातडीने पावले उचलावीत; संजय राऊतांची मागणी
मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही; अजित पवारांनी योगी आदित्यनाथांना सुनावलं