बेन स्टोक्स-संजू सॅमसनची मॅच विनिंग पार्टनरशिप; राजस्थानचा मुंबईवर एकतर्फी विजय

0
179

दुबई : आजच्या आयपीएलच्या राजस्थान राॅयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान राॅयल्सने मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्सनी पराभव केला.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 195 धावा केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्याने तुफानी फलंदाजी करताना केवळ 21 चेंडूत नाबाद 60 धावांची खेळी केली. तर सुर्यकूमार यादवने 26 चेंडूत 40 धावा, साैरभ तिवारीने 25 चेडूत 34 धावा, ईशान किशनने 36 चेंडूत 37 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर व श्रेयस गोपालने 2, तर कार्तिक त्यागीने 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना राजस्थानने हे लक्ष्य 18.2 षटकात 2 विकेट गमावत पूर्ण केले. राजस्थानकडून बेन स्टोक्सने 60 चेंडूत 107 धावा, तर संजू सॅमसनने 31 चेंडूत 54 धावा केल्या. दोघांनी 151 धावांची नाबाद भागीदारी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.

महत्वाच्या घडामोडी-

मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन- उद्धव ठाकरे

ऋतुराज गायकवाड-अंबाती रायडूची शानदार फलंदाजी; चेन्नईचा राॅयल चैलेंजर्स बेंगलोरवर 8 विकेट्सनी विजय

“मुख्यमंत्र्यांना बाहेर पडा म्हणणाऱ्या फडणवीसांना आता परिस्थिती किती गंभीर आहे, हे कळलं असेल”

राज्य सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा, कोकणासाठी विशेष पॅकेज जाहीर करा- प्रविण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here