आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याची बातमी आली होती. यावरून भाजप सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला होता.
‘जिल्ह्याची बदनामी सुरु आहे. त्याला एखादा जिल्हा शल्य चिकित्सक जबाबदार असेल, जिल्हाधिकारी जबाबदार असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असतील, पीएससीचे सगळे डॉक्टर जबाबदार असतील त्यांना जबाबदार धरायचं. काहीही झालं की बीड जिल्ह्याची बदनामी करण्याचं काम सुरु आहे’, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. यावरून आता पंकजा मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : आमची तीन चाकं मजबूत, शिवसेनेला MIM ची गरज नाही; अब्दुल सत्तार कडाडले
बीड जिल्ह्याची मी काळजी करते, तुमच्या निष्काळजीपणामुळेच जिल्ह्याची बदनामी होतेय’, असं जोरदार प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना दिलं. बीड जिल्ह्यातील लिंबागणेशमधील विकासकामांचं उद्घाटन आज पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या.
8 मार्चला माझ्या गळ्याचं ऑपरेशन झालं. डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला होता. माझी वाणी बंद झाली म्हणून मला करमत नव्हते. ऑपरेशन नंतर माझे हे पहिलेच भाषण आहे. मी शेकडो कोटींचा विकास केला. मी केलेल्या कामांचं क्रेडिट घेत नाही. बीडमध्ये उत्तम रोजगार निर्मिती व्हावी अशी माझी इच्छा होती. बीड मध्ये रेल्वे आणली. जसं घर आवरतो तसं मी माझा जिल्हा सावरला. मी तुमची कर्जदार आहे. गुंडागर्दीचं राजकारण केलं असतं तर मुंडे साहेबांना शोभलं असतं का? एक तरुण नेता निर्माण करणारी फॅक्ट्री मुंडेसाहेबांनी तयार केली. माझ्यासोबत काम करणारा कार्यकर्ता मंत्री, आमदार, खासदार झाला पाहिजे, असं पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
…ही तर चांगली गोष्ट; राष्ट्रवादी-MIM युतीवरून सुप्रिया सुळेंचं सूचक विधान
आमचा एक जरी आमदार फुटला तरी…; जयंत पाटलांचा महाविकास आघाडीच्या आमदारांना इशारा
इम्तियाज जलील यांनी MIM चा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत यावं- छगन भुजबळ