आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
यवतमाळ : बीआरएस नेते आणि माजी आमदार राजू तोडसाम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदारांवर बॉम्ब हल्ला करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी यवतमाळच्या हजारो शेतकरी, शेतमजूर यांच्या उपस्थितीत बीआरएसचे नेते माजी आमदार राजू तोडसाम यांनी मोर्चा काढला होता. यावेळी बोलताना, त्यांनी हे विधान केलं.
राजू तोडसाम नेमकं काय म्हणाले …
शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पण मला दुर्देवाने सांगावं लागतंय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ना पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं, ना आमदारांनी लक्ष दिलं, जिल्ह्यातील कोणताही नेता ना नदीवर, नाल्यावर, ना शेतावर आणि बांधावर गेला नाही. नेता कुठेच नाही गेला. याला आम्ही स्वत: शेतकरी, शेतमजूर, शोषित, पीडित, वंचित, बेरोजगार जबाबदार आहोत, असं राजू तोडसाम म्हणाले.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उचलणार ‘हे’ महत्त्वाचं पाऊल
दरम्यान, या जबाबदारीला जर आवाज उठवायचा असेल तर यानंतर या भागातला पालकमंत्री असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल. बॉम्ब घेऊन तयार राहा. आलेल्या लोकप्रतिनिधींवर बॉम्ब हल्ला करा. त्याच्याशिवाय ते सुधरणार नाहीत. त्याशिवाय सभागृहात बोलणार नाहीत. तसेच रस्त्यावर उतरणार नाहीत, असा हल्लाबोल राजू तोडसाम यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
निवडणूक आयोगाची शरद पवार-अजित पवार गटाला नोटीस; राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं?
अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेवरून, अमोल मिटकरींचा, राज ठाकरेंना टोला, म्हणाले…
“पक्षफुटीवर, जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, अजित पवार आमच्याच पक्षात, मात्र…”