Home महाराष्ट्र “पक्षफुटीवर, जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, अजित पवार आमच्याच पक्षात, मात्र…”

“पक्षफुटीवर, जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, अजित पवार आमच्याच पक्षात, मात्र…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली :  दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली होती.

कोरेगाव पार्कमध्ये उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही भेट झाली होती. या भेटीदरम्यान जयंत पाटील यांच्यासह आणखी 2 आमदार या बैठकीला उपस्थित होते. जवळपास अर्धातास ही बैठक सुरू होती., अशी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे अजित दादांसोबत जाणार, अशा चर्चा सूरू आहेत. अशातच जयंत पाटलांनी बैठकीला उपस्थित लावल्याने जयंत पाटील अजित दादांकडे जाणार, या चर्चा राजकीय वर्तुळात सूरू झाल्या. आता या सर्व प्रकरणावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी अजित पवारांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चा का होतात? याची मला कल्पना नाही. मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असून, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. अजित पवार आमच्याच पक्षात आहेत. पण, अजित पवारांनी पक्षात काही बदल केल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले आहे. शरद पवारांच्या वतीने आमच्याकडून उत्तर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगामध्ये भविष्यात न्यायनिवाडा होईल., असं जयंत पाटील म्हणाले. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, आम्ही यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवारांच्या संस्कृतीत राजकारण करणारे लोक आहोत. अचानक पक्षातून माणसे बाहेर जात असतील, तर हे टाळण्याचा प्रयत्न आवश्यक आहे. अन्यथा लढाई सुरु झाली, तर होणारच आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

युतीसाठी भाजपकडून ऑफर, मात्र…; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोठा गौफ्यस्फोट

…तर आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू; शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य

“जयंत पाटील, अजित दादांसोबत जाणार?; कालच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?”