Home महाराष्ट्र निवडणूक आयोगाची शरद पवार-अजित पवार गटाला नोटीस; राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं?

निवडणूक आयोगाची शरद पवार-अजित पवार गटाला नोटीस; राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षचिन्ह आणि पक्षावर दावा सांगितला आहे. ३० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष बदलल्याची माहितीही अजित पवार गटाकडून भारतीय निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. यानंतर आता निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला नोटीस पाठवली आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेवरून, अमोल मिटकरींचा, राज ठाकरेंना टोला, म्हणाले…

पक्षनाव आणि चिन्हाबाबत पाठवलेल्या नोटीसला तीन आठवड्यांच्या आत उत्तर द्यावं, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

अजित पवार गटाने पक्षातून बाहेर पडून भाजपाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा पाठवल्या होत्या. संबंधित नोटीसवर १७ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास आयोगानं सांगितलं होतं. पण शरद पवार गटाने संबंधित नोटीसला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे चार आठवड्यांचा अवधी मागितला होता.

महत्त्वाच्या घडामोडी –

“पक्षफुटीवर, जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, अजित पवार आमच्याच पक्षात, मात्र…”

‘ईडी’च्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपमध्ये गेले; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

युतीसाठी भाजपकडून ऑफर, मात्र…; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोठा गौफ्यस्फोट