सिडनी : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताला पाचव्या दिवसाअखेर 5 गडी बाद 334 धावाच करता आल्या व हा सामना अनिर्णीत झाला. भारताकडून विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतने सर्वाधिक 118 चेंडूत 97 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. तर चेतेश्वर पुजाराने 77 धावा, रोहित शर्माने 52 धावा, हनुमा विहारीने नाबाद 23 धावा, रविचंद्रन अश्विनने नाबाद 39 धावा करत भारताला सामना अनिर्णीत राखण्यात महत्वपूर्ण योगदान दिलं.
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड व नॅथन लायनने प्रत्येकी 2 विकेट, तर पॅट कमिंसने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
“राज ठाकरे यांचे चाहते हेच त्यांचं कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेवावं”
नितेश राणेंना फडणवीस तुरूंगात टाकणार होते, पण…; शिवसेनेचा मोठा गाैफ्यस्फोट
गरज नसल्यास माझी सुरक्षाही कमी करा- शरद पवार
सुरक्षा हटवल्याने आम्ही हादरून जाऊ असं नाही- रावसाहेब दानवे