सुळे घुसले की, किती दुखतं ते विचारुन घ्या एकदा; राष्ट्रवादीचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

0
496

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाणे येथेभव्य सभा भरवण्यात आली. या सभेत त्यांनी जोरदार टोलेबाजी करत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळें यांच्यावरही निशाणा साधला आहे.

”सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? सुप्रिया सुळेंनी बोलायचं नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त आणि फक्त राज ठाकरे यांचंच नाव”

“सुळे घुसले की किती दुखतं ते विचारुन घ्या एकदा…हत्तीचे सुळे कसे घुसतात माहिती आहे ना? आम्हालाही बोलता येतं. पण राजकारणात हे खूप गांभीर्याने, प्रगल्भतेने घ्यायचं असतं. लोकांच्या सुखात भर पडेल, त्यांचे अश्रू पुसायचे असतात…हास्यविनोद करणारे जगात फार आहेत आणपही आहात, असा जोरदार टोला आव्हाडांनी यावेळी राज ठाकरेंना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेसोबतच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा म्हणाले…; उद्धव ठाकरेंनी मला…”

जितेंद्र आव्हाडांनी तोंड बंद ठेवावं, अन्यथा…; मनसेचा इशारा

राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून ते…; चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here