Home महत्वाच्या बातम्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी शिजतंय; शरद पवारांच्या भेटीनंतर आता आशिष शेलार ‘वर्षा’वर...

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी शिजतंय; शरद पवारांच्या भेटीनंतर आता आशिष शेलार ‘वर्षा’वर दाखल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर आता आशिष शेलार वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

ही बातमी पण वाचा : संजय शिरसाटांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर, आता सुषमा अंधारेंचा, देवेंंद्र फडणवीसांना सवाल, म्हणाल्या…

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली होती. त्यानंतर शरद पवार यांची आज मुख्यमंत्री यांची अचानक भेट झाली. आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले.या भेटीमागचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, राजकीय भेटीगाठींचे हे सत्र सुरूच आहे.

दरम्यान, हातात काही कागदपत्र घेऊन शेलार वर्षावर दाखल झाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचा संदेश घेऊन शेलार आल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! शरद पवार, अचानक मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर, चर्चांना उधाण”

भाजप पक्ष माझा थोडी आहे, मी…; पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

फडणवीसांच्या भेटीनंतर, राज ठाकरेंची मनसे, शिंदे गट-भाजप युतीसोबत?; चर्चांना उधाण