अर्जुन तेंडुलकर IPL मध्ये खेळणार; ‘या’ संघाकडून प्रतिनिधीत्व करण्याची शक्यता

0
316

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये खेळणार आहे. यंदाच्या आयपीएलच्या लिलावात अर्जुनने आपलं नाव नोंदवलं आहे.

आयपीएलच्या लिलावात अर्जुनची बेस प्राईज ही 20 लाख रुपये आहे. मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केलेल्या सचिनच्या मुलाला मुंबईच्या संघातून खेळवण्यासाठी मुंबई इंडियन्स संघ उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, क्रिकेटचा देव म्हणून ओळखत असलेल्या सचिन तेंडुलकरच्या मुलाला कोण आपल्या संघात घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here