आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने विविध नेत्यांकडून तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली.
हे ही वाचा : शरद पवार हे पाॅवर हाऊस, त्यांचा नेम अचूक; जयंत पाटलांकडून स्तुतीसुमने
गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाचा व्हिडिओ धनंजय मुंडेंनी शेअर केला. तसंच या व्हिडिओत त्यांनी म्हटलं की, स्व. अप्पांच्या बाबतीत जयंती, पुण्यतिथी असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली. अप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला वंचित-उपेक्षित, शेतकरी-कष्टकरी, ऊसतोड कामगार यांच्या कल्याणाचा वसा आपल्यात आहे, तो जपुयात, पुढे नेऊयात. विनम्र अभिवादन अप्पा…, असं ट्विट करत धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहिली.
स्व. अप्पांच्या बाबतीत जयंती, पुण्यतिथी असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली. अप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला वंचित-उपेक्षित, शेतकरी-कष्टकरी, ऊसतोड कामगार यांच्या कल्याणाचा वसा आपल्यात आहे, तो जपुयात, पुढे नेऊयात. विनम्र अभिवादन अप्पा… pic.twitter.com/oXJAeM3EDO
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण”
बाळासाहेब आज असते तर त्यांनी संजय राऊतला लाथ मारून हाकललं असतं; निलेश राणेंचा घणाघात
‘याचा अर्थ दिवाळीत फोडलेले सर्व फटाके फुसके होते’; सदाभाऊ खोत यांचा मलिकांना टोला