Home क्रीडा इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

पुणे : टी-20 मालिकेनंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मालिकेतील तिन्ही सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर होणार आहेत.

एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार) , शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

23 मार्च : पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे : दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

26 मार्च : दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे  : दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

28 मार्च : तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे : दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

महत्वाच्या घडामोडी –

“राजस्थान हादरलं! ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेवर वाॅर्ड बाॅयनं केला रात्रभर बलात्कार”

“शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

पंतप्रधान मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला; म्हणाल्या…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार; सूर्यकुमारचं धमाकेदार आगमन, पहा व्हिडिओ