खासदाराला साधा अर्जही भरता येत नाही; गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला

0
843

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. यावरून शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या भाजप खासदार रक्षा खडसेंचे जिल्हा बँक संचालक पदासाठी दोन अर्ज बाद कसे होवू शकतात? खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं, असा टोला गुलाबराव पाटलांनी यावेळी लगावला.

हे ही वाचा : राष्ट्रवादीकडून भाजपला दिवाळीचे फटाके; भाजपात गेलेले नगरसेवक राष्ट्रवादीत परतणार?

एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, तर आम्ही समजू शकतो. पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटील यांनी बाद केला का? असा उपरोधक सवालही गुलाबराव पाटलांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ आमदाराचा भाजपात प्रवेश

कोणीही पक्ष सोडून गेला तरी, राष्ट्रवादीचा पराभव होणे अशक्य- जयंत पाटील

पिंपरी – चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का मिळणार! सात नगरसेवक ‘या’ पक्षाच्या संपर्कात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here