Home महाराष्ट्र अमृताताई,आपण जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो अशीच आवड जोपासा- रोहित पवार

अमृताताई,आपण जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो अशीच आवड जोपासा- रोहित पवार

मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्ताने अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं. अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काही लोकांना सहज, तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृता फडणवीस ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता, त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!, असं म्हणत रोहित पवार यांनी अमृता फडणवीस यांचं कौतुक केलंय.

दरम्यान, जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी… तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतिचा प्रवाह रोकणे शक्य नाही! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः ट्विट करून गाणं रिलीज झाल्याची माहिती दिली होती.

महत्वाच्या घडामोडी –

तपासाला सहकार्य करणाऱ्या एकनाथ खडसेंना अटक कशासाठी?; उच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न

“महाबळेश्वर हादरलं! मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनावर शाळेतच बलात्कार”

“देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”

“अभिनेता रणबीर कपूर कोरोना पाॅझिटिव्ह?”