Home महाराष्ट्र अमित शाह घेणार राज ठाकरेंची भेट?; भाजप-मनसे युतीची चिन्हे

अमित शाह घेणार राज ठाकरेंची भेट?; भाजप-मनसे युतीची चिन्हे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी विराजमान श्रीगणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमित शाह लवकरच मुंबई दौरा करणार आहेत. या दौऱ्यावेळी ते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : बापू, महाराष्ट्रात करमणूक बंद करा, 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन द्या; शिवसेनेचा टोला

काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. आता अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीची शक्यता आहे.

दरम्यान, या भेटीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी भाजप मनसेच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांची भेट; चर्चांना उधाण

येत्या 15 दिवसात भूमिका स्पष्ट करा अन्यथा…; मराठा क्रांती मोर्चाचा, शिंदे सरकारला इशारा

“शिंदे गटाला धक्का; 15 दिवसांपूर्वी प्रवेश केलेला कोल्हापूरचा ‘हा’ नेता पुन्हा स्वगृही परतला”