Home महत्वाच्या बातम्या ‘आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

‘आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : राज्यात ज्या पद्धतीने भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत, ते पाहता भविष्यात शिवसेना-भाजप सोबत येतील अशी शक्यता नाही. मात्र महाविकास आघाडी  येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्रित लढणार, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार भक्कमपणे काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता राष्ट्रीय स्तरावरचे नेते म्हणून लोक पाहत आहेत, इतके अप्रितम काम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : ‘हे’ सरकार टिकण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा मोठा वाटा; बाळासाहेब थोरातांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

दरम्यान यावेळी चंद्रकांत खैरेंनी एमआयएम पक्षावर देखील टीका केली आहे. एमआयएममुळे विखुरलेला मुस्लिम मतदार आता महाविकास आघाडीच्या सरकारमुळे मुस्लिम मतदार राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाजूने वळत आहे. एमआयएमच्या नगरसेवकांचा भ्रष्टाचार, दहशतीला मुस्लिम समाज कंटाळला आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत एमआयएमची वाताहात झाल्याशिवाय राहणार नाही. एमआयएमच्या नेत्यांच्या हे लक्षात आले आहे. म्हणून ओवेसी यांनी दिशाभूल करणारे वक्तव्य केले, असंही खैरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

रामदास आठवले वानखेडेंच्या पाठीशी उभे असतील तर, याहून दूर्देवी काही असू शकत नाही- नवाब मलिक

शिवसेने नंतर आता राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; माथेरानचा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत

पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच; सुप्रिया सुळेंनी फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग