आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळाप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खटाव येथील मेळाव्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मला असल्या लोकांविषयी काहीही बोलायचे नाही. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, मी नियमाने वागणारा माणूस आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
सोमय्या रोज काही ना काही आरोप करत असतात. मात्र, त्यांच्या आरोपाला उत्तर देणे गरजेचे वाटत नाही. कारण मी विकासकामांना अधिक प्राधान्य देतो. सहकारी साखर कारखाने आणि सहकारी संस्था या नको त्या व्यक्तींकडे गेल्या आहेत. ते चांगल्या विचारांच्या लोकांना द्या. तसेच सहकारात राजकारण शिरल्यामुळे सहकार मोडीत निघाला, असे सांगून व्यापारी दृष्टिकोनाला हरताळ फासल्यामुळेच सहकार चळवळ मोडीत निघायला सुरुवात झाली आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 65 कोटीत खरेदी केलेल्या कारखान्याने 700 कोटींचे कर्ज घेतले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
महत्वाच्या घडामोडी –
“..तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या”
आम्ही बांधावर होतो, तेव्हा पंकजा मुंडे अमेरिकेत होत्या; धनंजय मुंडेंचा टोला
जर पोलिसांना प्रियांका गांधी यांना सोडलं नाही तर…; नाना पटोलेंचा इशारा
पूरग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्व कळते असे नाही; अजित पवारांचं प्रत्युत्तर