“अजित पवार आता तुम्हाला कोणी वाचू शकत नाही, तुम्ही जेवढी मस्ती केली ती या आयुष्यातच भरावी लागणार”

0
533

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करणारं पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.

अजित पवार आता तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. तुम्ही जेवढी मस्ती केली ती या आयुष्यातच भरावी लागणार, असं म्हणत निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

कोणालाही उर्मट बोलायचं, कोणाचे राजकीय किंवा कौटुंबिक आयुष्य उध्वस्त करायचं, नियती कोणाला सोडत नाही. 2024 ला तुमचा पराभव बघायचा होता पण तुम्ही त्या अगोदरच जेलमध्ये असाल, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्रात सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटलांचं मानसिक संतुलन ढासळलंय”

अजित पवारांची सीबीआय चौकशी करा- चंद्रकांत पाटील

“त्यांच्याकडे केंद्राची सत्ता असेल तर आमच्याकडे महाविकास आघाडी सरकार”

“पडळकर ही एक प्रवृत्ती आहे, आणि अशी बांडगुळं भाजपमध्ये वाढत आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here