Home महाराष्ट्र अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या करिअरवर नांगर फिरवण्याचं काम केलंय- गोपीचंद पडळकर

अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या करिअरवर नांगर फिरवण्याचं काम केलंय- गोपीचंद पडळकर

266

मुंबई : पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्यावरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यासंबंधीतील अध्यादेश मागे घेण्याची मागणी केली होती. या मुद्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वात जातीयवादी पक्ष असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. 5 वर्षांच्या पोराला झोपेतून उठवून जरी विचारलं ना तरी तो पोरगा देखील सांगेल की कोणता पक्ष सर्वात जास्त जातीयवादी आहे., असा टोमणाही पडळकरांनी यावेळी लगावला.

दरम्यान, पडळकरांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीका केली. पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमाती, एससी-एसटी, विशेष मागास प्रवर्गही आहे. यातील ज्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यांनी या सर्व अधिकाऱ्यांच्या करिअरवर नांगर फिरवण्याचं काम केलंय हे स्पष्टपणे दिसत आहे, असं हल्लाबोल पडळकरांनी अजित पवारांवर यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकारमधील तीन पक्षांचे तीन मुख्यमंत्री व्हायले हवेत, कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार”

मराठा आरक्षणाला वंचितचा पाठिंबा! मराठा मोर्चात आता प्रकाश आंबेडकर स्वत: उतरणार”

“टाक खंडणी बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेनं राम मंदिरावर बोलूच नये, लायकीत राहावं”

“आंदोलन करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं, पण…”