अजित पवार निधी देत नाहीत, तर मग युतीत कसे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

0
460

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. यानंतर आज राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जेंव्हा शिंदे गटाने बंडखोरी केली, तेंव्हा अजित पवार निधी देत नाहीत, म्हणून आम्ही बंडखोरी केली असा दावा, शिंदे गटाने केला होता. मात्र आता अजित पवार हेच युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे निधी न देणारे अजित पवार युतीत कसे? असा सवाल विचारला जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उत्तर दिलं आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांच्या बंडावर सुप्रिया सुळेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाल्या…

अजित पवार निधी देत नव्हते म्हणून बंड केलं. आता तेच युतीत कसे काय? असा सवाल विचारला असता एकनाथ शिंदे यांनी, ते म्हणाले, “आता मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे कुठलीही तक्रार राहणार नाही.” ,  असं अगदी थोडक्यात उत्तर दिलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित पवार यांच्यानंतर आता ‘या’ नेत्याची विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती; शरद पवारांनी केली घोषणा

८० टक्के आमदार परत येतील; शरद पवारांचा दावा

मी साहेबांबरोबर…; अजित पवार यांचा बंडानंतर जयंत पाटलांनी केली भूमिका स्पष्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here