Home महाराष्ट्र अजित पवारांच्या बंडावर, उद्धव ठाकरेंची एका ओळीची रिएक्शन, म्हणाले…

अजित पवारांच्या बंडावर, उद्धव ठाकरेंची एका ओळीची रिएक्शन, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. यानंतर आज राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या या फुटीवर उद्धव ठाकरेंनी एका ओळीची प्रतिक्रिया दिली आहे. नांदा सौख्य भरे, असं उद्धव ठाकरे अजित पवारांच्या शपथविधीवर म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : अजित पवार निधी देत नाहीत, तर मग युतीत कसे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी 80 टक्के आमदार परत येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

ज्यांची नावं आली आहेत त्यातल्या काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधून आम्हाला निमंत्रित करुन सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केला आहे. याबाबतीत मी आत्ताच काही बोलणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित पवारांच्या बंडावर सुप्रिया सुळेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाल्या…

अजित पवार यांच्यानंतर आता ‘या’ नेत्याची विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती; शरद पवारांनी केली घोषणा

८० टक्के आमदार परत येतील; शरद पवारांचा दावा