Home महाराष्ट्र अजित पवार देणार काँग्रेसला मोठा धक्का?; काँग्रेसचे 15 आमदार फोडणार?

अजित पवार देणार काँग्रेसला मोठा धक्का?; काँग्रेसचे 15 आमदार फोडणार?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिद देवरा यांनी नुकताच पक्षाला सोडचिट्ठी देऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र आता अजितदादा पवार काँग्रेसला धक्का देण्याच्या मार्गावर आहेत.

काँग्रेसमधील काही आमदार आता अजितदादा गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आमदारांनी जातीय समीकरणे लक्षात घेऊन हे आमदार अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत असेही या सूत्रांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : भाजप आमदाराकडून करण्यात आलेल्या गोळीबारा प्रकरणी मोठी माहीत समोर!

दरम्यान, माजी मंत्री आणि वांद्रेचे माजी आमदार बाबा सिद्दीकी हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात सामील होऊ शकतात, अशी पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरु आहे. बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दिकी यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर बडा सिद्दिकी अजितदादा गटात सामील होणार अशा चर्चा रंगल्या होत्या.

महत्त्वाच्या घडामोडी – 

छगन भुजबळ यांचा मंत्रीपदाचा राजीनामा?; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

पूनम पांडेचा मृत्यू म्हणजे अफवा?; ‘नेटकरी म्हणाले ही तर…’

केंद्रीय अर्थसंकल्पावर उध्दव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हा अर्थसंकल्प म्हणजे…’