आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री अनील पाटील यांनी याबाबत बोलताना, एक मोठं वक्तव्य केलं. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांची इच्छा असल्याचं पाटील म्हणाले. यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावरून आता भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही बदल होणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! टोलनाका तोडफोड प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
“कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत, यात वावगं काही नाहीय. राष्ट्रवादीवाल्यांना वाटू शकतं की, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आमच्या पक्षातील लोकांना वाटू शकतं की भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र, मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही बदल होणार नाही”, असं फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं.
दरम्यान, या संदर्भात अजित पवार आणि मी, आमच्या दोघांच्या मनात पूर्ण स्पष्टता आहे. ज्यावेळी महायुतीची पूर्ण चर्चा झाली त्यावेळेसही अजित पवार यांना याबाबतची स्पष्टपणे कल्पना देण्यात आली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे. केवळ स्वीकारलीच नाही तर त्यांनी स्वत: आपल्या वक्तव्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही, असंही फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
“अजित पवार गटाने सरकारला पाठिंबा दिला नसता, तर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं थेट विधान
“अभिनेते किरण माने यांच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष, म्हणाले, सेक्सची भूक ही…”
समृद्धीवर मनसैनिकांनी टोलनाका फोडला, आता यावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…