आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
चंदीगड : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर दोन मंत्र्यांसह तीन नेत्यांनीही राजीनामे दिले आहेत. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं होतं. यावर अखेर सिद्धूंनी माैन सोडलं आहे. सिद्धूंनी ट्विटवर एक व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली.
माझी लढाई मुद्यांवर विचारांवर आहे. मी हक्काची लढाई लढतोय. त्यात मी तडजोड करणार नाही. मी हायकमांडची फसवणूक करत नाहीये, असं सिद्धू म्हणाले. ज्यांनी सुरक्षा घेतली, ते सुरक्षा रक्षक होऊ शकत नाहीत. मला पंजाबची प्रगती हवी. त्यात मी तडजोड करणार नाही, असंही सिद्धूंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
हक़-सच की लड़ाई आखिरी दम तक लड़ता रहूंगा … pic.twitter.com/LWnBF8JQxu
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) September 29, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…तर आपली सीट शंभर टक्के निवडून आली म्हणून समजा- सुप्रिया सुळे
पुण्यातील मनसेच्या नेत्यांचा भाजपसोबत युतीचा आग्रह; राज ठाकरे म्हणाले…
मुंबई इंडियन्सचा जोरदार कमबॅक; पंजाबवर 6 विकेट्सनी विजय
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी घोटाळा करण्याची कला विकसित केली; किरीट सोमय्यांचा आरोप