Home महाराष्ट्र राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता, वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले…

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता, वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले…

875

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा तंबी दिली होती. थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, अशा शब्दांत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना तंबी दिली होती.

राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पत्र पोस्ट केलं आहे, यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना वादग्रस्त वक्तव्य न करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा इशारा पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनाच असल्याच्या चर्चा सूरू झाल्या आहेत. राज ठाकरेंच्या पत्रानंतर आता वसंत मोरेंची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.

हे ही वाचा : “अजित पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्यानं घेतली, राधाकृष्ण विखे पाटलांची भेट, चर्चांना उधाण”

राजकारणाच काय खरे नाही, निवडणुका ही लोकं कधी घेतील माहिती नाय बाबा… जरा उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करतो… अशी पोस्ट वसंत मोरेेंनी केली आहे. त्यामुळे मोरेंच्या या पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“कोल्हापूरमध्येही मनसेचा भगवा फडकला, उखळू ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात”

अजित पवार यांनी काढला उदय सामंत यांच्या सोबत फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

जयंत पाटीलसे जो टकरायेगा, उसका करेक्ट कार्यक्रम हो जाएगा; विधानसभेत विरोधी पक्षाची जोरदार घोषणाबाजी