Home महाराष्ट्र जयंत पाटीलसे जो टकरायेगा, उसका करेक्ट कार्यक्रम हो जाएगा; विधानसभेत विरोधी पक्षाची...

जयंत पाटीलसे जो टकरायेगा, उसका करेक्ट कार्यक्रम हो जाएगा; विधानसभेत विरोधी पक्षाची जोरदार घोषणाबाजी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून काल विधानसभा सभागृहात जोरदार राडा पहायला मिळाला.

सभागृहात अध्यक्षांसंदर्भात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा : “धक्कादायक! सांगलीत खाजगी रूग्णालयात, रूग्णावर जादुटोण्याने उपचाराचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद”

या कारवाईनंतर विरोधक जोरदार आक्रमक झाले असून त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निषेध करत आंदोलन केले. तसेच यावेळी विरोधकांनी, जयंत पाटील से जो टकराएगा, करेक्ट कार्यक्रम हो जाएगा, अशा जोरदार घोषणाबाजी  करत या कारवाईचा निषेध केला.

दरम्यान, या ‘निर्लज्ज सरकारचा धिक्कार असो’, ‘जाएंगे जाएंगे खोकेवाले जाएंगे’, असं म्हणत विरोधी पक्षातील आमदारांनी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदार जयंत पाटील यांना खांद्यावर उचललं. तसेच यावेळी ‘जयंत पाटील से जो टकरायेगा, करेक्ट कार्यक्रम हो जायेगा’, तसेच ‘टप्प्यात आला, कार्यक्रम झाला’, अशा घोषणा जयंत पाटील यांच्या समर्थक आमदारांनी यावेळी दिल्या.

महत्त्वाच्या घडामोडी –

भ्रष्टाचारांच्या आरोपांवर नारायण राणेंचा धक्कादायक दावा, म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून, एकनाथ शिंदेंनी…

“राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं सावट?; आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत दिली अपडेट, नवी नियमावली जाहीर”

चंद्रकांत पाटलांनी प्रचार केलेल्या गावात राष्ट्रवादीने मारली बाजी