Home पुणे चंद्रकांत पाटलांनी प्रचार केलेल्या गावात राष्ट्रवादीने मारली बाजी

चंद्रकांत पाटलांनी प्रचार केलेल्या गावात राष्ट्रवादीने मारली बाजी

297

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप समर्थक पॅनेलच्या प्रचारासाठी सभा घेतलेल्या खेड तालुक्यातील साकुर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादीच्या जानकीमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : ठाकरे गटाला आणखी एक झटका; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलेला असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साकुर्डी येथे भाजपाला मानणाऱ्या जानुबाई ग्रामविकास पॅनेलच्या समर्थनार्थ सभा घेऊन मतदारांना ‘योग्य व चांगल्या उमेदवारांना निवडून द्या,’ असं आवाहन केलं होतं. मात्र या निवडणुकित राष्ट्रवादीच्या जानकीमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने बाजी मारली

दरम्यान, राष्ट्रवादीच्या जानकीमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सरपंचपदासह नऊ पैकी सात जागांवर विजय मिळवला, तर विरोधी पॅनेलला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तर आधी राजीनामा द्या, मग…; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली तंबी

“धक्कादायक! औक्षण करत असताना उडाला भडका, सांगलीत नवनिर्वाचित सरपंच थेट रूग्णालयात,”

चंद्रपूरमध्ये मनसेचा भगवा फडकला, दाताला ग्रामपंचायतीवर मनसेचं वर्चस्व