आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
विशेष म्हणजे रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास ही भेट होत असल्याने या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मध्यरात्री, फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
ही बातमी पण वाचा : “पावसामुळे WTC FINAL 2023 रद्द झाल्यास, कोण वर्ल्ड चॅम्पियन असेल?; ICC नं स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गट-भाजप युतीमध्ये मनसे देखील सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. तर राज ठाकरे यांनी देखील शिंदेंची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडून मनसेसोबतच्या युतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
महत्त्वाच्या घडामोडी –
कुस्तीपटूंना जर योग्य न्याय नाही मिळाला, तर…; राज ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र