Home महाराष्ट्र “अजित पवारांनंतर, आता भावी मुख्यमंत्री म्हणून, नाना पटोले बॅनरबाजीवर झळकले, चर्चांना उधाण”

“अजित पवारांनंतर, आता भावी मुख्यमंत्री म्हणून, नाना पटोले बॅनरबाजीवर झळकले, चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख असलेले बॅनर लागताना पाहायला मिळत आहे. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांची यात भर पडली आहे.

कल्याणमध्ये नाना पाटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! भाजप नेते आशिष शेलारांनी घेतली, शरद पवारांची भेट, तर्कवितर्कांना उधाण”

नाना पाटोले हे आज एका कार्यक्रमासाठी डोंबिवलीत आले होते, त्यावेळी कल्याणमध्ये पटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनरवरुन आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर विविध ठिकाणी झळकले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मी दोन वर्षांपूर्वी भाजपा प्रवेशाची ऑफर स्वीकारली असती तर…; राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार का? नाना पटोेलेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“मी, तुम्हांला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, महाविकास आघाडीची एकजूट कायम राहणार”