आदित्य ठाकरेंनी साैंदर्य पाहून खासदारकी दिली, शिरसाटांच्या वक्त्यावर, प्रियांका चतुर्वेदींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…

0
388

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात हिंदी भाषिक कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. तसेच यावेळी ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार म्हणत टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक  मोठा दावा केला आहे.

आदित्य ठाकरेंनी, प्रियांका चतुर्वेदी यांची सुंदरता पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली, असं धक्कादायक विधान संजय शिरसाट यांनी केलं. यावर आता खुद्द प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, असा टोला प्रियांका चतुर्वेदी यांनी यावेळी लगावला. प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट याबाबत ट्विट केलं आहे.

ही बातमी पण वाचा : लवकरच शरद पवार भाजपाला पाठिंबा देतील; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.

संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे.

मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.

संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून…

— Priyanka Chaturvedi (@priyankac19) July 30, 2023

महत्त्वाच्या घडामोडी –

मणिपूर घटनेवरून, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले, अरे लाज वाटली पाहिजे…

संभाजी भिडेंना अटक करा, काँग्रेसच्या मागणीवर आता भाजपची प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवारांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?; नाना पटोलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here