आदित्य म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असणारा खरा नातू- सुधीर मुनगंटीवार

0
2148

मुंबई : औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणारच, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

आदित्य ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर केल्यास त्यांची ऊंची तरुणांच्या मनात सह्याद्रीच्या पर्वतापेक्षा मोठी होईल. आदित्य ठाकरे यांनी नामांतर करून दाखवल्यास त्यांचं पहिलं अभिनंदन मी करेन, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आदित्य म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असलेला खरा नातू आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव करू, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरेंच कौतुक केलं आहे.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दूरदूरपर्यंत सत्तेचा मोह नव्हता. त्यांनीच औरंगाबादकरांना औरंगाबादचं नामांतर करण्याचं वचन दिलं होतं. आजोबांचं हे स्वप्न जर नातू पूर्ण करत असेल तर अधिवेशनाच्या पहिल्याच भाषणात मी त्यांचं मोठ्या मनाने अभिनंदन करेल, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आम्ही तोंड उघडलं तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे बाहेर येतील- अमोल मिटकरी

“धनंजय मुंडे यांना मी ओळखत नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही”

“सांगलीत 5 किलो सोने लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी केलं जेरबंद”

“शरद पवारांनी नैतिकता पाळावी, चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here