Home महाराष्ट्र “पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आवाज उठवल्यामुळे माझ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला”

“पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आवाज उठवल्यामुळे माझ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला”

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आवाज उठवल्यामुळे माझ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, आज मला शरद पवारांची आठवण होते. पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत. माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पवारांनी मला बोलावून घेतलं. तक्रारीची कॉपी वाचली आणि तुझा नवरा कशातच नसल्याचं सांगितलं. त्यानंतर माझ्या पतीविरोधात केस उभी राहिली, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही “

मोठी बातमी! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

…तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर बसू शकला असता का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल

“संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची धमक नाही, पण…”