Home महत्वाच्या बातम्या “उल्हासनगरमध्ये लवकरच होणार राजकीय भूकंप?; जयंत पाटलांनी केली ‘या’ नेत्यासोबत मध्यरात्रीपर्यंत चर्चा”

“उल्हासनगरमध्ये लवकरच होणार राजकीय भूकंप?; जयंत पाटलांनी केली ‘या’ नेत्यासोबत मध्यरात्रीपर्यंत चर्चा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उल्हासनगर : आगामी निवडणुकांच्या तोंडावर उल्हासनगर येथील राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. 4 वेळा आमदार झालेले पप्पू कलानी राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. मध्यरात्री तब्बल साडेतीन वाजेपर्यंत या नेत्यांमध्ये बैठक झाल्याने उल्हासनगरमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पप्पू कलानी यांना एका हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे ते 15 वर्षे तुरुंगात होते. त्यानंतर ते आता पुन्हा यातून बाहेर आले असून राजकरणात पुन्हा सक्रिय झाले आहे.

हे ही वाचा : मनसे- शिवसेना पुन्हा आमने-सामने; या कारणासाठी दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी पप्पू कलानी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. रात्री तब्बल साडेतीन वाजेपर्यंत या नेत्यांमध्ये खलबतं झाली.

महत्वाच्या घडामोडी – 

“गोव्यातील प्रत्येक कामात भ्रष्टाचार झालाय, किरीट सोमय्याजी गोव्याची गाडी पकडा, गोवा युझ काॅलींग फाॅर यु”

काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या झोपडपट्टी विभागाचे प्रदेश उपाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

“शिवसेनेशी केलेली बंडखोरी भोवणार, माथेरानमधील ‘त्या’ नगरसेवकांचा आज लागणार निकाल”