आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
घाटकोपर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून मनसेत पक्षप्रवेशाचा धडाकाच सुरू झाला आहे. अशातच अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन घाटकोपरमधील अनेक तरुण-तरुणींनी मनसेत प्रवेश केला आहे.
मनसेच्या या पक्षप्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला व युवक तसेच मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रभाग क्र. 129 येथे पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन शिंपी समाज हॉल, पारशिवाडी येथे करण्यात आले होते. हा मेळावा विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या उपस्थितीत पार पडला.
हे ही वाचा : बायकोनं मारलं तरी सांगतील की यात केंद्र सरकारचा हात आहे- देवेंद्र फडणवीस
दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच सक्रिय झाले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नाशिक, पुणे या शहरांतील दौरे वाढले आहेत. 23 ऑक्टोबर रोजी भांडूपमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता . मात्र राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचे पूर्वनियोजित दौरे रद्द करण्यात आले आहे .
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांच्या रूपानं राष्ट्रवादीला देशाचा एक सर्वोच्च नेता मार्गदर्शक म्हणून लाभला”
“समीर वानखेडे हा काही भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही”
नवाब मलिकांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, आता पुढची कथा मी सांगणार- संजय राऊत