Home महाराष्ट्र हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवा; चंद्रकांत खैरेंचं इम्तियाज जलील यांना...

हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवा; चंद्रकांत खैरेंचं इम्तियाज जलील यांना आव्हान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. अशातच राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या जीआर म्हणजेच शासन निर्णयावर ‘औरंगाबाद’च्या अगोदर ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केला गेला आहे. या उल्लेखानंतर एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘हिंमत असेल तर शहराचे नाव बदलून दाखवा’ असं थेट आव्हान दिलं आहे, त्यावरुन शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला.

हे ही वाचा : ‘या’ कार्यक्रमासाठी अमित शहा आणि शरद पवार येणार एकाच मंचावर

औरंगाबाद शहराचे नाव आधीच बदलले आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी नाव बदललं.  आता फक्त सोपस्कार बाकी राहिला आहे. इम्तियाज जलील काहीही बोलतो, हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवावं, आम्ही या शहराचे नाव बदलणारच, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.

दरम्यान, एका सरकारी परिपत्रकातही औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर असा करण्यात आला. यानंतर इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेत हिंमत असेल तर शहराचे नाव बदलून दाखवा, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढले त्याने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील जलील यांनी केली होती.

महत्वाच्या घडामोडी – 

नाशिकमध्ये शिवसेना देणार भाजपला धक्का! संजय राऊतांच्या मेळाव्यात भाजपचे नगरसेवक

ठाकरे कुटुंबातला भावनिक क्षण; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन; तब्येतीची केली विचारपूस

‘सरकार तुमचं आहे, हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवा’; इम्तियाज जलील यांचा इशारा