भाजपच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा लहान फोटो; मनसेने केली भाजपवर नाराजी व्यक्त

0
1079

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पालघर : पालसई जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळाल. भाजप उमेदवाराच्या पोस्टरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोटोपेक्षा भाजप नेत्यांचे फोटो मोठे असल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भाजपने तत्काळ या नाराजीची दखल घेत थेट पोस्टरच बदलून टाकले.

पालसई जिल्हा परिषद गटातून धनश्री चौधरी यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पालघर जिल्हा परिषदेच्या माजी महिला व  बालकल्याण सभापती होत्या. दरम्यान, प्रचारासाठी लावण्यात आलेल्या त्यांच्या पोस्टरवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या फोटोचा आकार भाजप नेत्यांच्या फोटोच्या तुलनेत खूपच लहान होता. त्यामुळे आज दिवसभर भाजप व मनसे कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर वाद रंगला होता.

दरम्यान, अंगलट येऊ नये यासाठी भाजपने तत्काळ पोस्टर बदलून राज ठाकरे यांचा मोठा फोटो असलेले पोस्टर लावण्यात आले.

महत्वाच्या घडामोडी –

ग्लेन मॅक्सवेलची विस्फोटक खेळी; आरसीबीचा राजस्थानवर 7 विकेट्सने दणदणीत विजय

अजित पवार, काँग्रेसची मागणी धुडकावत तीन सदस्यीय प्रभाग प्रस्ताव राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवला; शिक्कामोर्तब होणार?

काँग्रेसला मोठा धक्का; 11 समर्थक दिल्लीकडे रवाना, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here