Home महत्वाच्या बातम्या मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रकृती बिघडली होती. त्यामुळे आजचा मुंबईतील आणि उद्याचा पुण्यातील मनसे शाखाप्रमुखांचा मेळावा रद्द करण्यात आला होता. राज यांना कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हे ही वाचा : “विधानसभेत चांगला निकाल द्यायचाय, तुम्हांला जागे करायला आलोय”

राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आईंनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. सौम्य लक्षणे असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोघांवर घरीच उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र राज ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला असून राज आणि त्यांच्या आई लीलावती रुग्णालयात पोहचल्या आहेत. ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, सध्या लीलावती रुग्णालयात दोघांच्याही काही चाचण्या केल्या जात आहे. त्यानंतर चाचण्यांचा अहवाल बघून पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच राष्ट्रीय राजकारणात येणार”

मुख्यमंत्र्यांवर कुणी दबाव टाकत असेल तर भाजप आंदोलन करेल; भाजपच्या ‘या’ नेत्याचा टोला

नोकरीबाबत सल्ला घेण्यासाठी वडिलांनी शरद पवारांकडे नेलं- दिलीप वळसे पाटील