आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहे. आज दिल्लीत देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत गोवा जिंकण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : “जो शेतकरीहिताच्या आडवा येईल त्याला तुडवायचा, हेच माझे धोरण”
आगामी वर्षात फेब्रुवारी महिन्यात गोवा विधासभेची निवडणूक होणार आहे. गोव्यामध्ये विधानसभेच्या 40 जागा आहेत. गोव्यात भाजपा विद्यमान सत्ताधारी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ते सध्या गोव्याचे प्रभारी आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह या नेत्यांमध्ये गोवा जिंकण्याच्या रणनिती संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे.
दरम्यान, या बैठकीत गोव्या जिकंण्याबरोबरच मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भातही चर्चा होईल. मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये आहे. काहीही करून मुंबई महापालिका जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे. त्यासाठी महापालिका जिंकण्यासाठी भाजपा तयारीला लागली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर…, किरीट सोमय्यांचा नवाब मलिकांना इशारा
जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या; संघाचा भाजपाला सल्ला
“देगलूरच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा करेक्ट कार्यक्रम”